मराठवाड्यातील निजाम कालीन शाळांचे रुपडे पालटणार; शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश

मराठवाड्यातील औरंगाबाद येथिल १३० शाळा, बीड येथील २९३, हिंगोली येथिल ४२, जालना येथिल २०३, लातूर येथिल ९४, नांदेड येथिल १५७, उस्मानाबाद येथिल ५१, परभणी येथिल ७५ अशा एकुण १हजार ४५ शाळांमधील सुमारे साडेतीन हजार वर्गखोल्यांचे नविन बांधकाम या निधीतून करण्यात येणार आहे.

मुंबई: मराठवाड्यातील सन १९६० पुर्वीच्या निजाम कालिन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे रुपये२०० कोटीचा निधी नुकताच पुरवणी मागणीत मंजूर झाला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद येथिल १३० शाळा, बीड येथील २९३, हिंगोली येथिल ४२, जालना येथिल २०३, लातूर येथिल ९४, नांदेड येथिल १५७, उस्मानाबाद येथिल ५१, परभणी येथिल ७५ अशा एकुण १हजार ४५ शाळांमधील सुमारे साडेतीन हजार वर्गखोल्यांचे नविन बांधकाम या निधीतून करण्यात येणार आहे.
मोडकळीस आलेल्या जिल्ह्या परिषदेच्या शाळांचे बांधकाम व दुरुस्ती करण्यात येणार असून शासकीय शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यात पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा आणि शिक्षकांचे प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार आहे.