महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ परिचारिका अधिनियमात सुधारणा करणार

सद्यस्थितीत परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी व परिषदेच्या निवडणूका घेण्यासाठी प्रशासकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) अध्यादेश २०२१ यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली.

    मुंबई : महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर नियुक्त प्रशासकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र परिचारिका अधिनियम १९६६ मध्ये सुधारणेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत १९ डिसेंबर २०२० रोजी संपली आहे.

    सद्यस्थितीत परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी व परिषदेच्या निवडणूका घेण्यासाठी प्रशासकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) अध्यादेश २०२१ यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली.

    हा अध्यादेश १९ डिसेंबर २०२० पासून अंमलात आल्याचे मानण्यात येणार आहे. यासाठी  महाराष्ट्र परिचारिका अधिनियम १९६६ च्या कलम ४० मध्ये पोटकलम (३) नंतर नविन परंतुक समाविष्ट करण्यात आले आहे.