मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे वणव्यात रूपांतर होईल; प्रविण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणा बाबत वेळकाढूपणा सुरू आहे. एखादा समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आणि त्यांना पाठिंबा देणारे, नेतृत्व करणाऱ्या जनतेला आदळआपट करत आहेत असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजुला बोलताना संघर्ष नको संवाद साधा. परंतु सरकार कडून मराठा आरक्षणा संदर्भात कोणताही संवाद साधला जात नसुन त्याना मराठा आरक्षणा संदर्भात काही घेणे देणे नाही आहे, असा टोला दरकेर यांनी मुख्यमंत्री यांना लगावला.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणा बाबत वेळकाढूपणा सुरू आहे. आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे आरक्षण टिकवता आले नसुन मराठा समाजाला आपल्या हक्काच्या वंचित रहावे लागले. त्यांना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे हा सरकराचा नाकर्तेपणा असल्याची आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरकेर यांनी केला आहे.

    सायन ते सी.एस.टी मोटर सायकल रॅली

    शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याची मोहीम आखली आहे. मेटे यांनी जनजागृती मोहिमेअंतर्गत सायन ते सी.एस.टी अशी मोटर सायकल रॅली काढण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, तसेच कार्यकर्ते व  मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिक उपस्थीत होते. मराठा आरक्षण मोटर सायकल रॅलीत माध्यमासोबत बोलताना दरेकर यांनी मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे.

    आरक्षणा संदर्भात काही घेणे देणे नाही

    दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणा बाबत वेळकाढूपणा सुरू आहे. एखादा समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आणि त्यांना पाठिंबा देणारे, नेतृत्व करणाऱ्या जनतेला आदळआपट करत आहेत असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजुला बोलताना संघर्ष नको संवाद साधा. परंतु सरकार कडून मराठा आरक्षणा संदर्भात कोणताही संवाद साधला जात नसुन त्याना मराठा आरक्षणा संदर्भात काही घेणे देणे नाही आहे, असा टोला दरकेर यांनी मुख्यमंत्री यांना लगावला.

    वणवा पेटण्याआधी मुख्यमंत्र्यांनी जागे व्हावे

    दरेकर म्हणाले की, मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका मराठा समाजाच्या चिंगारीचा वणवा पेटायला वेळ लागणार नाही. वणवा पेटण्या आधी मुख्यमंत्र्यांनी जाग व्हावे. भाजप, केंद्र, फडणवीस यांच्या वर आरोप करण्यापेक्षा या अधिवेशनात मराठा समजाला न्याय देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, अशी खंत दरेकर यांनी व्यक्त केली.