मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे आणि सतत पडत असल्यामुळे तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

मुंबई : मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणा-या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव आज (दिनांक १८ ऑगस्ट २०२०) रात्री ९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे.

गतवर्षी हा तलाव २६ जुलै २०१९ रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी दिनांक १५ जुलै २०१८ रोजी ओसंडून वाहू लागला होता. 

तसेच वैतरणा धरणही तुडूंब भरुन वाहत आहे. या धरणाचे देखील दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. वैतरणा धरण हे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ३ महत्त्वाच्या धारणांपैकी एक आहे. जिल्ह्यात आठवड्या भरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. असाच पाऊस पडत राहिल्या लवकरच तानसा आणि भातसा धरणही लवकरच भरेल.