The monkeys coming from the national park have become the head of the forest department

ठाणे : राष्ट्रीय उद्यानाच्या जवळच असलेल्या ठाण्याच्या रामनगर दोन जंगली वानरांचा संशयास्पद मृत्यूला आठवडा उलटला नाही. तोच रविवारी पुन्हा एक वानर त्याच ठिकाणी इलेक्ट्रिक पोलवर बसलेल्या वानराचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वानराला खाली काढून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या  स्वाधीन केले.  विद्युत तारांना हात लावताच उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांमुळे वानर जाळून खाक झाला. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन ठाणे प्रमुख संतोष कदम याना मिळताच त्यांनी वनविभाग आणि अग्निशमन दलाला सूचना केली.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन ठाणे, अग्निशमन आणि वनविभागाचे अधिकारी पोहचले. अग्निशमन दलाने शिडी लावून इलेक्ट्रिक पोलवर मृतावस्थेतील वानराला  खाली काढून ते वनविभागाच्या स्वाधीन केले.

आठवड्यातच विद्युत तारेचा शॉक लागून तीन वानरांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय उद्यानातून येणारे वानर हे वनविभागाच्या डोक्याला ताप ठरले आहेत. त्यामुळे आता वनविभागाची चिंता वाढलेली असल्याचे वनविभाग अधिकारी संजय पवार यांनी सांगितले.