मुंबई | Maharashtra Assembly Session LIVE: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, आज आणि उद्या ६ जुलै या दोन दिवसात पार पडणार अधिवेशन | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJuly, 05 2021

Maharashtra Assembly Session LIVE: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, आज आणि उद्या ६ जुलै या दोन दिवसात पार पडणार अधिवेशन

द्वारा- Navarashtra Staff
द्वारा- Prajakta Dhekale
डिजिटल कंटेन्ट रायटर
15:06 PMJul 05, 2021

भाजपचे १२ आमदारांचे सदस्यत्व एका वर्षासाठी निलंबित

अधिवेशनात अर्वाच्य वर्तणूक केल्याप्रकरणी  संजय कुटे, अभिमन्यु पवार, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर,  राम सातपुते, नारायण कुचे, अतुल भातखळकर   बंटी भांगडिया, हरीश पिंगळे,जयकुमार रावल गिरीष महाजन  यांचे एक वर्षसाठी सदस्यत्व निलंबित. अनिल परब यांनी दिली माहिती  

14:18 PMJul 05, 2021

तालिका अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की झाली नाही

 

मात्र तालिका अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नसल्याचे सांगत विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे 

14:13 PMJul 05, 2021

तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन होणार

पावसाळी अधिवेशनाला ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून भाजप  आक्रमक होत, तालिका अध्यक्ष यांच्या बरोबर धक्काबुक्की ,शिवीगाळ केल्याचा  प्रकार घडला आहे. यामुळे  प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन होणार आहे.  अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष मारेती आप्पा या आमदारांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

13:08 PMJul 05, 2021

ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक

ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक 

12:55 PMJul 05, 2021

केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा-विधानसभेत ठराव

 केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, सरकारचा ठराव. ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांकडून विधानसभेत ठराव पटलावर. मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना अर्धसत्य सांगितलं असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

12:39 PMJul 05, 2021

एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकरची आत्महत्या सरकारच्या गालावरची चपराक -सुधीर मुनगंटीवार

पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचं असल्याचं  मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.  राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही याचाच अर्थ काँग्रेसला काहीच किंमत नाही, सत्तेसाठी काँग्रेस काहीही करू शकते

12:37 PMJul 05, 2021

३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, ही महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षे संदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार असल्याची माहिती आहे.  ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. 

 

मुंबई: आजपासून सुरू झालेल्या पावसाळी आधिवेशनात प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळानं आक्षेप व्यक्त केला. ‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलंय ,असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
३० शुक्रवार
शुक्रवार, जुलै ३०, २०२१

एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.