विमा संरक्षणच्या मागणीसाठी केईएममध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन

कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता भासत आहे. अशावेळा इंटर्नशिप करणा-या डॉक्टर्सनाही दिवसरात्र काम करावे लागते आहे. मात्र त्यांना विमा कवच दिला गेलेला नाही. या मागणीकडे लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इंटर्नशिप डॉक्टर्सवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

    मुंबई:केईएम रुग्णालयातील इंटर्नशिप करणा-या डॉक्टरांनी सोमवारी आपल्या मागण्यांसाठी केईएम रुग्णालयाबाहेर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. विमा संरक्षण द्यावा, ही प्रमुख मागणी या डॉक्टरांनी केली आहे.

    कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता भासत आहे. अशावेळा इंटर्नशिप करणा-या डॉक्टर्सनाही दिवसरात्र काम करावे लागते आहे. मात्र त्यांना विमा कवच दिला गेलेला नाही. या मागणीकडे लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इंटर्नशिप डॉक्टर्सवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या डॉक्टरांनी विमा कवच द्यावा, अशी मागणी करत सोमवारी मुंबईतील केईएम रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. पैशा अभावी काही दिवसांपूर्वी इंटर्नशिप करणाऱ्या एका डॉक्टरचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला. त्यामुळे इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना विमा कवच मिळावे या मागणीसाठी डॉक्टर्सनी आंदोलन केले.