बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-पेस (Electric Jaguar I-Pace) होणार आज लॉन्च

भारतात Jaguar I-Pace च्या लाँचिंगसाठी कंपनी उत्सूक आहे. Jaguar I-Pace मध्ये ९०kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी १००kW रॅपिड चार्जरद्वारे ८०टक्के चार्ज करण्यासाठी केवळ ४५ मिनिटं लागतील. या गाडीमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे ४०० पीएस पॉवर देते.

    मुंबई: सातत्याने वाढत असलेलया पेट्रोलच्या किंमती तसेच वाढते प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे नागरिकांचा काळ वाढ आहे. यासाठी नवीन वर्षात अनेक कंपन्याही इलेक्ट्रिक निर्मितीवर भर देत आहेत. प्रसिद्ध कार निर्माती कंपनी जॅग्वार लँड रोवर इंडिया (Jaguar Land Rover India) कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. (Jaguar I-Pace Electric SUV Launching today, know price and specs)

    जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने (Jaguar Land Rover India) त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-पेस (Electric Jaguar I-Pace) ९ मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली होती, ही लाँच डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर कार २३ मार्च २०२१ रोजी (आज) लाँच केली जाणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. त्यामुळे आज ही बहुप्रतीक्षित कार लाँच होणार आहे. दरम्यान, जॅग्वार लँड रोवरने (जेएलआर) आधीच या मॉडेलसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे.

    Electric Jaguar I-Pace मध्ये या गोष्टी आहेत खास

    कारमध्ये एक स्लोपिंग बोनट, एलईडी हेडलॅम्प्स, हनीकॉम्ब पॅटर्न ग्रिल आणि डिटेल्ड सेंटर एअर-डॅम आहे. या इलेक्ट्रिक वाहनात आकर्षक दिसणारे सेट्स आणि हलके ORVM (Outside Rear-view Mirror) देखील मिळतील.
    या इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी ४६९२ मिमी, रुंदी २०११ मिमी आणि उंची१५६६ मिमी आहे. व्हीलबेस आणि ग्राउंड क्लीयरन्स २९९०मिमी आणि १७४ मिमी आहे.

    ही कार फूजी व्हाइट, कॅल्डेरा रेड, सॅन्टोरीनी ब्लॅक, युलाँग व्हाइट, इंडस सिल्व्हर, फिरेंज रेड, सेझियम ब्लू, बोर्स्को ग्रे, आयगर ग्रे, पोर्टोफिनो ब्लू, फर्लेन्डो पर्ल ब्लॅक आणि अरुबा कुलसह एकूण १२ रंगांमध्ये सादर केली जाणार आहे.

    आय-पेस इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स (केवळ एचएसई), ८ वे सेमी पावर्ड लक्सटेक स्पोर्ट सीट, ३८० W मेरिडियन साऊंड सिस्टम, इंटरअॅक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले, ३ डी सराउंड कॅमेरा, ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, अ‍ॅनिमेटेड डायरेक्शन इंडिकेटर, लेदर स्पोर्ट सीट्स, ८२५W मेरीडियन ३ डी सराउंड साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, अडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

    दरम्यान, जेएलआर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘लॅन्ड रोव्हर डिफेंडरच्या डिजिटल व्हेरिएंट ऑफरला दिलेल्या शानदार प्रतिसादानंतर आम्ही Jaguar I-Pace भारतात सादर करण्यास खूप उत्सुक आहोत.’

    ४५ मिनिटात ८० टक्के चार्ज होणार

    लँड रोवर डिफेंडरचे डिजिटल वेरिएंट सादर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता भारतात Jaguar I-Pace च्या लाँचिंगसाठी कंपनी उत्सूक आहे. Jaguar I-Pace मध्ये ९०kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी १००kW रॅपिड चार्जरद्वारे ८०टक्के चार्ज करण्यासाठी केवळ ४५ मिनिटं लागतील. या गाडीमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे ४०० पीएस पॉवर देते. कंपनीने आय-पेसच्या ग्राहकांना चार्जिंगची बेस्ट सुविधा देण्यासाठी टाटा पॉवरशी भागीदारी केली आहे.

    बॅटरीवर ८ वर्षांची वॉरंटी

    आय-पेस च्या ९० केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरीवर ८ वर्षांची किंवा १.६ लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. सोबतच आय-पेसचं पाच वर्षांसाठी सर्विस पॅकेज दिलं जाईल. ही कार तीन वेरिएंट्समध्ये सादर केली जाईल. त्यामध्ये एस, एसई आणि एचएसई अशी या तीन वेरिएंट्सची नावं आहेत. ही कार४.८ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. जॅग्वारच्या आय-पेसच्या फ्रंट साईडला दोन सिंक्रोन्स मॅग्नेटिक इलेक्ट्रिक मोटर्ससह रियर एक्सलही मिळेल, जे ९६९ एनएम पीक टॉर्कसह 395 बीएचपी पॉवर आउटपुट जनरेट करेल. यामध्ये AWD (All-wheel drive) सिस्टिमही दिली जाईल. ही 480 हून अधिक किलोमीटपर्यंतची रेंज देईल.