पालिकेकडे केवळ २८०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक ; कशी करणार कोरोनावर मत

मुंबई (Mumbai): मुंबई पालिकेकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा 2,800 तर टोसीलीझुमॅब औषधांचा 140 एवढाच साठा शिल्लक असल्याचे पालिकेकडूनच माहिती मिळत आहे. वेळोवेळी गरजेनुसार औषधे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असले तरी तूर्तास कोरोनावर प्रभावी समजले जाणाऱ्या औषधांची चणचण असल्याचे दिसून येत आहे.

  • टोसीलीझुमॅबची ही तीच स्थिती

कोरोनावर अद्याप ही लस नसल्याने रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याचे तज्ञ सांगतात. यातून या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यामुळे साठाही कमी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. पालिका रुग्णालयात कोरोना औषधं साठा कमी होत असला तरी उपलब्ध करून देण्याकडे कटाक्ष असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मध्यम अथवा गंभीर प्रकृती असल्यास अशा रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्याचे प्राण वाचवणे शक्य आहे. पालिकेच्या नायर, सायन, आणि केईएम रुग्णालयात या इंजेक्शनचा वापर केला जात असून कोरोनामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णासाठी हे इंजेक्शन उपयोगी ठरत आहे. पालिकेने 33 हजार इंजेक्शन खरेदी केली होती. त्यापैकी 2,800 इंजेक्शनचा साठा पालिकेकडे उपलब्ध आहे. मात्र लक्षणे नसलेली रुग्ण आढळत असल्याने सगळ्यांनाच ही इंजेक्शन देणे गरजेचे नसल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. तर सध्या टोसीलीझुमॅबची मागणी कमी झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शनला मागणी आहे. त्यामुळे, गरजेनुसार साठा मागवण्यात येईल, असेही काकाणी यांनी सांगितले.

टोसीलीझुमॅब इंजेक्शन –
मागणी –      2,495
वापर –          2,355
शिल्लक –      140

रेमडेसिवीर इंजेक्शन –
मागणी –        33,727
वापर –            30, 927
शिल्लक –         2,800