घरोघरी लसीकरणात डोस वाया जावू नये यासाठी पालिका करणार नियोजन

सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तीस घरी जाऊन लस देण्याची मुंबई महापालिकेची तयारी आहे. मात्र लस दिल्यानंतर त्या रुग्णाला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे. तसेच या रुग्णाला फॅमिली डॉक्टरकडून लस घ्यावी का, असे होकारार्थी पत्र आणणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मात्र, लसींच्या एक वायलमध्ये १० डोस असतात. एका घरात एकच जेष्ठ नागरिक असेल तर मग ९ डोस वाया जाऊ शकतात.

    मुंबई : दुर्धर आजारामुळे सहा महिन्यांहून अधिक काळापासून बेडवर उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण मुंबईत १ ऑगस्टपासून सुरु केले जाणार आहे. पालिकेने त्यासाठी तयारी केली आहे. मात्र, एका वायलमध्ये १० डोस असून एका घरातील एका बेडरिडन पेशंटमागे ९ डोस वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डोस वाया जाऊ नये यासाठी मुंबई महापालिका नियोजन करणार आहे. परंतु राज्य सरकारची नियमावली जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

    सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तीस घरी जाऊन लस देण्याची मुंबई महापालिकेची तयारी आहे. मात्र लस दिल्यानंतर त्या रुग्णाला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे. तसेच या रुग्णाला फॅमिली डॉक्टरकडून लस घ्यावी का, असे होकारार्थी पत्र आणणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मात्र, लसींच्या एक वायलमध्ये १० डोस असतात. एका घरात एकच जेष्ठ नागरिक असेल तर मग ९ डोस वाया जाऊ शकतात. त्यामुळे घरातील इतर सदस्य लसीकरणाची मागणी करतील तर तसे सगळ्यांचे लसीकरण करणे योग्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या नियमावली नंतर पालिका योग्य तो निर्णय घेईल, असेही काकाणी यांनी सांगितले.

    मुंबईत आतापर्यंत सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस सुमारे १५ लाख लोकांनी घेतला आहे. मुंबईला एकूण १ कोटी ८० लाख डोसची आवश्यकता होती. आतापर्यंत ५० टक्के लस टोचून झाली असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.