BMC

कोरोना संसर्गित मुलांसाठी तयार असलेल्या बालरोग विभागात हे स्थापित केले जाणार आहे.टेकमे निर्मित या प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत १३ लाख रुपये आहे. दोन महिन्यांत व्हेंटिलेटर बसविणे अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने नवजात शिशूंच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटसर्ची ऑर्डर देण्यास मान्यता दिली आहे.

    मुंबई – कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. त्यामुळे मुंबई मॉडेलचे कौतुक झाले आहे. मुंबई महानगर पालिकेने आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्याची तयारी करीत आहे. मुंबईत नवजात शिशुंसाठी अर्जेंटिनामधून २२ इंटेंसिव्ह केअर व्हेंटिलेटर्स आयात करणार आहे.नवजात शिशूंच्या देखभालीसाठी हे व्हेंटिलेटर आयात करण्यात येणार आहेत.

    कोरोना संसर्गित मुलांसाठी तयार असलेल्या बालरोग विभागात हे स्थापित केले जाणार आहे.टेकमे निर्मित या प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत १३ लाख रुपये आहे. दोन महिन्यांत व्हेंटिलेटर बसविणे अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने नवजात शिशूंच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटसर्ची आॅर्डर देण्यास मान्यता दिली आहे.

    गंभीररित्या आजारी असलेल्या नवजात शिशुंसाठी किंवा श्वसनाच्या अडचणी असलेल्या मुलांच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटर वापरण्यात येणार आहेत.हे व्हेंटिलेटर्स कोरोना रुग्णालये, जुन्या आणि नवीन जंबो सेंटरमध्ये बसवले जातील या केंद्रांमध्ये मुलांसाठी कोरोना वॉर्ड असतील.

    संपूर्ण आरोग्य सेवा यंत्रणा मूलभूत सुविधा, औषधे आणि उपकरणे यांच्या सोयी-सुविधा तिसºया कोरोना लाटेपूर्वी करण्यात येत आहेत. तसेच, वैद्यकीय कर्मचाऱ्याना उच्चस्तरीय प्रशिक्षणही देण्यात येत आहे. असे पालिकेच्या वैदयकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.दरम्यान कोरोनाची दुसरी लाट थेपविण्यासाठी पालिका प्रभावीपणे काम करत असल्याने ती मंदावली आहे.तिसऱ्या लाटेसाठीही ते झोकून देवून काम करतील आणि तिला थोपविण्यासाठी प्रयत्न करतील असे अधिकारी मोठया आत्मविश्वासाने बोलत आहेत.