धनंजय मुंडेंवरील ‘त्या’ आरोपाचं स्वरूप गंभीर, शरद पवारांचं सूचक वक्तव्य

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांनी मुंडेंवरती टीकास्त्र (Criticize On Munde) सोडले. तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. दरम्यान, धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणं माझ कर्तव्य आहे. त्यांचं मत घेऊन पुढील पाऊलं टाकलं जातील. याला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

पुढे ते म्हणाले की, राजकारण होतंय का यावर मी जास्त भाष्य करणार नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य वाचलं. त्यांनी यामध्ये संयमाने जाण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पक्षप्रमुखांचं हे मत असेल आणि इतरांचं दुसरं असेल तर अशा परिस्थितीचा फायदा विरोधकांकडून केला जात आहे. याबद्दल अधिक सांगायची गरज नाही.