The NCB does not know the difference between tobacco and marijuana; Trolls trolled Nawab Malik saying cannabis is herbal tobacco

न्यायालयाच्या आदेशानुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Trolls trolled Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हटले आहे. या वक्तव्यामुळे नवाब मलिक चांगलेच ट्रोल झाले आहेत.

  मुंबई : न्यायालयाच्या आदेशानुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Trolls trolled Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हटले आहे. या वक्तव्यामुळे नवाब मलिक चांगलेच ट्रोल झाले आहेत.

  सोशल मिडीयावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर मिम्स आणि मजेदार कमेंट्स वर्षाव होत आहे.

  गांजा म्हणजे हर्बल तंबाखू…

  “आमचे जावई हर्बल तंबाखू खायचे त्यांना गांजा समजून एनसीबीने साडे आठ महिने डांबून ठेवलं..” – नवाब मलिक.. ई हर्बल तंबाकू का होता है??…

  “माझा जावई हर्बल तंबाखू खायचा.. त्याला गांजा समजून एनसीबीने त्याला साडे आठ महिने डांबून ठेवलं..” – नवाब मलिक.. आता तर नवाब मालिकांची कसून चौकशी करण्यात यावीच, एनसीबी महोदय..

  जावायाकडे 200 किलो गांजा सापडला नाही, जो सापडला तो हर्बल तंबाखू होता -नवाब मलिक ओ @nawabmalikncp हरबल तंबाखू साठी कोर्टाने जावयाला 8 महिने तुरुंगात ठेवला काय ? फेकायची पण हद्द आहे भिशी…

  नवाब मलिक यांच्या जावयाला अटक होऊन ईतके दिवस झाले आणि मलिकांना आता कळालं तो गांजा नसून हर्बल तंबाखू आहे… अबे इतके दिवस घरात लॅब तयार करून टेस्ट करत बसला होता का? असे मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.

  नेमकं काय आहे प्रकरण

  मलिक यांचे जावई समीर खान यांना 13 जानेवारी रोजी अटक झाली होती. 27 सप्टेंबरला एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने समीर खान, करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना साडे आठ महिन्यानंतर जामीन दिला. यावेळी कोर्टाची लेखी ऑर्डर प्राप्त झाली आहे. न्या. जोगळेकर यांनी ही ऑर्डर जाहीर केली. या ऑर्डरनंतरचा सगळा घटनाक्रम नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांसमोर मांडला. 14 जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले की, मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही माध्यमांना खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी खोटे दावे करून करुन लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

  बोगस कारवाया, जावयालाही अडकवले

  एनसीबी ही तपास संस्था बोगस कारवाया करते. कालही मी हेच म्हणत होतो आणि आजही माझे हेच मत आहे. माझ्या जावयाला व अन्य काही लोकांना एनसीबीने ड्रग्ज तस्करीच्या खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले, असा आरोप मलिक यांनी केला. प्रत्यक्षात हे प्रकरण केवळ साडेसात ग्रॅम गांजाचे होते. हा गांजा जिच्याकडून पकडण्यात आला, तिला सोडण्यात आले. मात्र, माझा जावई समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि करण सजलानी यांना अडकवण्यात आले. समीर यांना जामीन मिळू नये म्हणून एनसीबीने शक्य तितका वेळकाढूपणा केल्याचा आरोपही मलिक यांनी केला. एनसीबीच्या वेळकाढूपणामुळं या प्रकरणाची सुनावणी सहा महिन्यानंतर सुरू झाली. तरी देखील एनसीबीचे आरोपपत्र तयार नव्हते. नंतर प्रकरण कनिष्ठ कोर्टात गेले. तिथेही आरोपपत्र दाखल करण्यासाठी साडेतीन महिने लावले गेले. हे सर्व ठरवून केले गेले, असा आरोप मलिक यांनी केला.