७ जुलै रोजी काँग्रेसच्या नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होईल; नाना पटोले

सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेस कडे आहे. नाना पटोले यानी राजीनामा दिल्यानंतर हे रिक्तपद भरणे आवश्यक आहे. आगामी अधिवेशन  ७ जुलै रोजी घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्या नंतर  कॉग्रेस नेत्यांमध्ये आज यामुद्यासह विविध विषयावर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर  काँग्रेस नेत्यांच्या  या बैठकीत मराठा, ओबीसी आणि अन्य आरक्षणाबाबतही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात भाजप सामाजिक वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

    मुंबई : सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेस कडे आहे. नाना पटोले यानी राजीनामा दिल्यानंतर हे रिक्तपद भरणे आवश्यक आहे. आगामी अधिवेशन  ७ जुलै रोजी घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्या नंतर  कॉग्रेस नेत्यांमध्ये आज यामुद्यासह विविध विषयावर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर  काँग्रेस नेत्यांच्या  या बैठकीत मराठा, ओबीसी आणि अन्य आरक्षणाबाबतही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात भाजप सामाजिक वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

    राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर काँग्रेसला काय भूमिका मांडता येईल, याबाबत आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत चर्चा झालीय. राज्यात 2017 पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरु आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटे बोलण्याचे काम करते. महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असा दावाही पटोले यांनी केला भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणलं, असा आरोपही पटोले यांनी केलाय.

    मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 2 वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असं पटोले म्हणाले. त्याचबरोबर 7 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांचे नाव घोषित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

    भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला (OBC) ग्राह्य धरु नये, अशी टीकाही पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी असल्याचा आरोप पटोले यानी केला.