सचिन वाझे यांच्या अटकेनंतर ९० दिवसांच्या आत आरोप पत्र दाखल करण्यात एनआयए अयशस्वी

तळोजा कारागृहात बंदी करण्यात आलेल्या सचिन वाझे यांनी न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. कारण एनआयए सचिन वाझे यांच्या अटकेनंतर ९० दिवसांच्या आत आरोप पत्र दाखल करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

    मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरातील एँटीलिया जवळ विस्फोटांनी भरलेली एक गाडी सापडली आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी सचिन वाझे यांनी न्यायालयात सुटका व्हावी यासाठी याचिका दाखल केली आहे. तळोजा कारागृहात बंदी करण्यात आलेल्या सचिन वाझे यांनी न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. कारण एनआयए सचिन वाझे यांच्या अटकेनंतर ९० दिवसांच्या आत आरोप पत्र दाखल करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

    याचिका मध्ये सांगण्यात आलयं की, एनआयए वेळेच्या आधीच आरोप पत्र सिद्ध करण्यास अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे वाझेंना स्वत: जामीन मिळवून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मार्च मध्ये अटक करण्यात आलेल्या वाझेंनी जामीन मिळवण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. परंतु एनआयए ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यास अयशस्वी ठरले आहेत.

    न्यायालयाने जूनमध्ये एनआयएला आरोप पत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता. परंतु सचिन वाझे यांनी आता एनआयएच्या वेळेवर आणि आरोप पत्र दाखल करण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे न्यायालय आता २२ जुलै रोजी यावर सुनावणी करणार आहेत.