Manusakh Hiren Suicide? Manusakh Hiren's last mobile location found; Shocking twist in the case

एनआयएच्या अधिकारी जया रॉय यांनी यांनी याबाबतची माहिती दिली. अँटालिया स्फोट प्रकरण तसेच हिरेन मृत्यू प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली असून ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वाझे यांना अटक झाल्याने महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली. त्यातच आता हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्याने आघाडी सरकारवर नामुष्की ओढावली आहे.

    मुंबई : ठाकरे सरकारला जबरदस्त झटका देणारा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. अँटेलिया स्फोट प्रकरणापाठोपाठ आता मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास देखील NIA करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले आहेत.

    एनआयएच्या अधिकारी जया रॉय यांनी यांनी याबाबतची माहिती दिली. अँटालिया स्फोट प्रकरण तसेच हिरेन मृत्यू प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली असून ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वाझे यांना अटक झाल्याने महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली. त्यातच आता हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्याने आघाडी सरकारवर नामुष्की ओढावली आहे.

    २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक आढळून आली. यानंतर या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्कॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदरच्या खाडीत संशयास्पदरित्या आढळून आला. यानंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली.

    दरम्यान, हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ कार चोरी प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याने दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा अशी मागणी देखील केली जात होती.
    अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने NIA ला मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.