The night is of the enemy ... rush to the rescue as water seeps into the first floor of the building

मध्यरात्री मुसळधार कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची दैना करून टाकली. थयथयाट करत बरसलेल्या या पावसाने एका रात्रीत अनेकांचे बळी घेतले. या पावसामुळे नद्यांचा समुद्र झाला होता. ददिसर नदीला पूर आल्याने बाजूच्या वसाहतीत पाणी शिरले. सखल भागाला तलावाचे, तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. या पाण्यातून दुचाकी गाड्या ओंडक्याप्रमाणे वाहून जात होत्या, तर चारचाकी गाड्या अर्ध्या अधिक बुडाल्या होत्या. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येईल म्हणून काही लोक इमारतीच्या टेरेसवर जाऊन राहिले होते.

  मुंबई : मध्यरात्री मुसळधार कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची दैना करून टाकली. थयथयाट करत बरसलेल्या या पावसाने एका रात्रीत अनेकांचे बळी घेतले. या पावसामुळे नद्यांचा समुद्र झाला होता. ददिसर नदीला पूर आल्याने बाजूच्या वसाहतीत पाणी शिरले. सखल भागाला तलावाचे, तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. या पाण्यातून दुचाकी गाड्या ओंडक्याप्रमाणे वाहून जात होत्या, तर चारचाकी गाड्या अर्ध्या अधिक बुडाल्या होत्या. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येईल म्हणून काही लोक इमारतीच्या टेरेसवर जाऊन राहिले होते.

  दोनशे मिमीपेक्षा अधिक पाऊस

  शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा जोर पहाटे ४ वाजल्यानंतर कमी झाला. रात्री ११ ते पहाटे ४ या साधारणपणे ५ तासांच्या कालावधी अनेक ठिकाणी तब्बल २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला. यानुसार सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर पाऊस महापालिकेच्या ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला. दहिसर खालोखाल चेंबूर परिसरात २१८.४५ मिलिमीटर, विक्रोळी पश्चिम परिसरात २११.०८ मिलिमीटर, कांदिवली परिसरात २०६.४९ मिलिमीटर, मरोळ परिसरात २०५.९९ मिलिमीटर, बोरिवली परिसरात २०२.६९ मिलिमीटर, किल्ला (फोर्ट) परिसरातील महापालिका मुख्यालय येथे २०१.९३ मिलिमीटर आणि ‘जी दक्षिण’ विभाग परिसरात (वरळी) २००.४ मिलिमीटर इतका पाऊस नोंदविण्यात आला.

  सखल भाग पाण्याखाली

  सखल भागाला तलावाचे, तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. या पाण्यातून दुचाकी गाड्या ओंडक्याप्रमाणे वाहून जात होत्या, तर चारचाकी गाड्या अर्ध्या अधिक बुडाल्या होत्या. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येईल म्हणून काही लोक इमारतीच्या टेरेसवर जाऊन राहिले होते. घरात शिरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चाकरमान्यांची रविवारची सु्ट्टी वाया गेली.

  मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्य़ाने येथील वसाहतीत पाणी भरले. क्रांती नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.