महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीची संख्या स्थिर; राज्यात ४,१३० नवीन रुग्णांची नोंद

राज्यात काल दिवसभरात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबई : राज्यात शनिवारी ४,१३० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८२,११७ झाली आहे. काल २,५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५२,०२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात काल दिवसभरात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ४१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४५८४६ एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९९१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]