corona test

नवी दिल्ली : दिवाळीनंतर संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी जोरात चर्चा होती, दिवाळीच्या सणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली असेही सांगण्यात येत होते. देशात पुन्हा लॉकडाऊनच्या अफवांनाही उधाण आले होते. दिवाळीत जी शिथिलता देण्यात आली, त्यामुळेच संक्रमण वाढले असे नेते आणि जाणकार सांगू लागले होते. प्रत्यक्षात मात्र वस्तूस्थिती ही नाही, पाच राज्य वगळता देशातील इतर राज्यांत ही वस्तूस्थिती नाही. दिवाळीनंतर कोरोनाने प्रभावित सर्वाधिक पाच राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. राज्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्या घटली असली तरी मृतांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानसह  दिल्लीत दिवाळीनंतर कोरोना रुगणांची संख्या वाढली.

दिल्लीत दिवाळी आधी रोज नव्या सहा हजार रुग्णांची नोंद होत होती. दिवाळीनंतर हा आकडा वाढला.

महाराष्ट्राचा विचार करता दिवाळी नंतर रुग्ण संख्या वाढली. मात्र, ही रुगण आता आटोक्यात आली असली तर मृतांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याने आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाबा ठरत आहे. बुधवारी राज्यात १११ करोना मृत्यूची नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५२ % एवढे असले तरी. मृतांच्या संख्येमुळे काळजी वाढली आहे.