रूग्णांचा आकडा दररोज वाढतोय; मुंबईत २७०० पेक्षा जास्त इमराती सील

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढतो आहे. नवीन रूग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. मुंबई महापालिका अलर्ट झाली असून, पून्हा रुग्णांचे ट्रेसिंग केले जात आहे. त्यानुसार पून्हा इमारती सील केल्या आहेत. मागील आठवड्यात सील केलेल्या इमारतींच्या संख्या २७०० पर्यंत पोहचली आहे.

    मुंबई : मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढतो आहे. नवीन रूग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. मुंबई महापालिका अलर्ट झाली असून, पून्हा रुग्णांचे ट्रेसिंग केले जात आहे. त्यानुसार पून्हा इमारती सील केल्या आहेत. मागील आठवड्यात सील केलेल्या इमारतींच्या संख्या २७०० पर्यंत पोहचली आहे.

    कोरोनाचे वाढते रूग्ण ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पालिका सतर्क झाली आहे. मुंबईत सील झालेल्या इमारतींची संख्या २०० ने कमी झाली होती. परंतु, एका आठवड्यात पुन्हा इमारती सील झालेल्यांची संख्या २७०० पर्यंत पोहचली आहे.

    जर, नियमांचे पालन मुंबईकरांकडून होत नसेल, तर पुढे कठिण परिस्थिती उद्भावेल. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर करावाच. नाहीतर २०००, ५००० आणि १००० हजारांपर्यंत दंड ठोठावू असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.