राज्यात रूग्ण संख्या ४ हजाराने कमी झाली; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१% ; २२,१२२ नवीन रुग्णांची नोंद

सोमवारी राज्यात २२,१२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच रविवारच्या तुलनेत ४ हजाराने रूग्ण संख्या उतरली असल्याचे समोर आले. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,०२,०१९ झाली आहे. आज ४२,३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,२७,५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई: सोमवारी राज्यात २२,१२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच रविवारच्या तुलनेत ४ हजाराने रूग्ण संख्या उतरली असल्याचे समोर आले. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,०२,०१९ झाली आहे. आज ४२,३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,२७,५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान, राज्यात काल ३६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ३६१ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २३१ ने वाढली आहे.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३२,७७,२९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,०२,०१९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,२९,३०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १०४९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६९७९५९ एवढी झाली आहे. तर ४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४६१३ मृत्यूची नोंद करण्यात आली.