corona

शनिवारी २३,५०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८,५७,९३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७,८६,१४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,८८,०१५ (२०.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई : राज्यात २१,९०७ नवीन रुग्णांची (new patients ) नोंद झाली असून कोरोना (Corona Virus) बाधित रुग्णांची संख्या ११,८८,०१५ झाली आहे. राज्यात २,९७,४८० ऍक्टिव्ह (Active) रुग्ण आहेत. महाराष्ट्र २३ हजार ५०१ रुग्ण बरे (recovering ) होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे होऊन गेलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक (higher ) आकडा असल्याचे सांगितले जात आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ लाख ५७ हजार ९३३ वर पोहोचली आहे. राज्यात ४२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.

राज्यात ४२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५०, ठाणे १८, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा १, मीरा भाईंदर मनपा ८, वसई विरार मनपा ७, रायगड १५, नाशिक ७, अहमदनगर ११, जळगाव ९, पुणे ५१, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर १६, सातारा २६, कोल्हापूर २५, सांगली २६, औरंगाबाद १४, लातूर ५, उस्मानाबाद ५, नांदेड ४, अमरावती १, नागपूर ३६ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ४२५ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४८ मृत्यू सातारा ८, औरंगाबाद ७, नागपूर ७, पुणे ४, ठाणे ४, पालघर ४, यवतमाळ ३, कोल्हापूर ३, नांदेड २, सांगली २, अहमदनगर १, चंद्रपूर १, रत्नागिरी १ आणि वर्धा १ असे आहेत.

शनिवारी २३,५०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८,५७,९३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७,८६,१४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,८८,०१५ (२०.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,०१,१८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३९,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.