corona

मुंबईत कोरोना आटोक्यात येत असून प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 1600 इतकी कमी झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याने दिली आहे. सणासुदीच्या कालावधीनंतर वाढलेली रुग्ण संख्या उतरणीला लागली आहे. ३० नोव्हेंबरला ०.३४ असणारी रुग्णवाढीची सरासरी सध्या ०.२१ टक्क्यावर आली आहे. दुपटीचा वेगही कमालीचा वाढू लागला आहे. त्यामुळे डिसेंबर मध्ये तब्बल ९०० ठिकाणांनी नियमांच्या कचाट्यातून मोकळा श्वास घेतला.

मुंबई (Mumbai).  मुंबईत कोरोना आटोक्यात येत असून प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 1600 इतकी कमी झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याने दिली आहे. सणासुदीच्या कालावधीनंतर वाढलेली रुग्ण संख्या उतरणीला लागली आहे. ३० नोव्हेंबरला ०.३४ असणारी रुग्णवाढीची सरासरी सध्या ०.२१ टक्क्यावर आली आहे. दुपटीचा वेगही कमालीचा वाढू लागला आहे. त्यामुळे डिसेंबर मध्ये तब्बल ९०० ठिकाणांनी नियमांच्या कचाट्यातून मोकळा श्वास घेतला.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढवली होती. तसेच कठोर नियम घातले होते. बाहेरील नागरिकांना ये- जा करण्यास मनाई केली होती. जून नंतर लॉकडाऊन शिथील करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्राची संख्याही कमी होऊ लागली. मात्र, नोव्हेंबर मध्ये दिवाळी आणि सुणासुदीचा काळ यामुळे रुग्ण वाढण्याची भिती व्यक्त केली होती. पालिकेच्या ठोस उपाययोजना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणी मुळे कोरोना आटोक्यात आला आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या दिवसागणिक घटत आहे.

३० नोव्हेंबर रोजी मुंबईत झोपडपट्ट्या-चाळीतील कंटेनमेंट झोनची संख्या ४३४ होती. ती १७ डिसेंबर रोजी ३७२ झाली आहे. म्हणजेच गेल्या पंधारवड्यात कंटेनमेंट झोनची संख्या ६२ ने कमी झाली आहे. तर सील इमारतींची संख्या ५ हजार २१२ होती. ती १७ डिसेंबर रोजी ४४०४ पर्यंत खाली आहे. म्हणजेच सील इमारतींची संख्या ८०८ ने कमी झाली आहे. पालिकेनेही झोपडपट्ट्या-चाळीतील कंटेनमेंट झोन आणि सील इमारतींची संख्या ८७० ने कमी झाल्याचा दावा केला आहे. म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या सुमारे 1600 ने कमी झाल्याचे आरोग्य खात्याने सांगितले.