गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ होणार, नवी पॉलिसी काय आहे? : वाचा सविस्तर

आता वाहनधारकांना भारत सिरीजमध्ये त्यांचे वाहन नोंदणी करता येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आता या अधिसूचने अंतर्गत जे वाहनधारक त्यांचे वाहन घेऊन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात, त्यांना यापूढे नव्याने वाहन नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.

    मुंबई : दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांसाठी नियमांनुसार त्यांचे वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन गेले तर त्यांच्यासाठी एका वर्षाच्या आत वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागत आहे. पण, आता यापूढे या वाहनधारकांना भारत सिरीजमध्ये त्यांचे वाहन नोंदणी करता येणार आहे.

    दरम्यान यापूढे त्यांना दुसऱ्या राज्यात नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आता या अधिसूचने अंतर्गत जे वाहनधारक त्यांचे वाहन घेऊन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात, त्यांना यापूढे नव्याने वाहन नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.

    या भारत सिरीजचा जास्त फायदा नोकरीच्या कामानिमीत्त इतर राज्यात जाताना या वाहनधारकांना नवीन नोंदणी करून क्रमांक घेण्याची गरज नाही. बीएच सिरीज असलेले वाहने जुन्या नोंदणी क्रमांकावरूनच परराज्यात चालवू शकणार आहेत.

    दरम्यान या योजनेमुळे सतत परराज्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांची नोंदणीच्या त्रासातून सुटका होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नवीन वाहनांसाठी भारत सिरीज ( बीएच ) हे नवीन नोंदणी चिन्ह असणार आहे. यापूर्वी नोंदणी करणाऱ्या वाहनांना परराज्यात प्रवास करताना बीएच सिरीजचे चिन्ह दिलं जात असे. आता यापूढे नव्याने नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.