बैल विकताना मालक रडला, अन् बैलाच्या डोळ्यात आलं पाणी…

माणूस मुक्या जिवांना खूप जीव लावतो. घरात पाळीव प्राणी असेल, तर तो कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिलं जातं, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांवर प्रेम केलं जातं. त्याचप्रमाणं शेतकरीही आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाला खूप जीव लावत असतात. दरम्यान असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी बैल हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो.

    मुंबई : माणूस मुक्या जिवांना खूप जीव लावतो. घरात पाळीव प्राणी असेल, तर तो कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिलं जातं, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांवर प्रेम केलं जातं. त्याचप्रमाणं शेतकरीही आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाला खूप जीव लावत असतात.

    दरम्यान असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी बैल हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या बैलगाडा शर्यती बंद असल्यानं आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांचा सांभाळ करणं कठिण जात आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आपल्या मुक्या जनावरांना विकत असलेलं पाहायला मिळत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शेतकरी आपल्या लाडक्या बैलाला विकत असताना त्याचा ऊर भरून आल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, आपल्या काळजावर दगड ठेऊन शेतकरी बैलाला विकत आहे. त्याच्यावर गुलालाची उधळण करत त्याची पाठवणी करत आहे. यावेळी शेतकरी तर रडताना दिसत आहेच मात्र बैलाच्या डोळ्यातही अश्रू तरळलेले दिसत आहेत.

    दरम्यान, शेतकरी बैलाच्या पाया पडत असून त्याला घट्ट मिठीही मारताना पाहायला मिळत आहे. शेजारी उभे असलेले नागरिकही भावनिक झालेले पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर सध्या अनेक ठिकांणाहून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.