Crowds at nightclubs in Mumbai; A warning to impose night curfew if not improved

कोरोनाशी संबधित सर्व नियम धाब्यावर बसवत वेळमर्यादा संपल्यानंतरही या क्लबमध्ये लेट नाईट पार्टी सुरु होती. नियमाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी धाड टाकत ही पार्टी उधवून लावली. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग... असे ट्विट करत पोलिसांनी एक प्रकारचा इशाराच दिला आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर धाड टाकली. यावेळी बड्या सेलिब्रेटींवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी केलेले एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

ड्रॅगन फ्लाय कल्बवर टाकलेल्या धाडीनंतर क्रिकेट सुरेश रैनासह ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझॅन आणि गायक गुरु रंधवासह एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विट करत दिली. या ट्विटची सुरुवातच मुंबई पोलिसांनी एका भन्नाट कॅप्शनने केली आहे. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग… असे म्हणत पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ५ पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.

असे असताना कोरोनाशी संबधित सर्व नियम धाब्यावर बसवत वेळमर्यादा संपल्यानंतरही या क्लबमध्ये लेट नाईट पार्टी सुरु होती. नियमाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी धाड टाकत ही पार्टी उधवून लावली. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग… असे ट्विट करत पोलिसांनी एक प्रकारचा इशाराच दिला आहे.