पोयसर नदी अरुंद झाल्याने नागरिकांचे हाल; झोपडपट्टी सहीत सोसायाट्यामध्येही पाणी शिरल्याने रहिवाशांचे प्रचंड नुकसान

झोपडपट्टीतील रहिवाशी गाढ झोपेत असताना घरात पाणी शिरले.यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य सामान वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र तासभरात गुढघ्या इतके पाणी शिरल्याने पलंग, कपाट, टेलिव्हिजन इतर सामानाची नासधूस झाली. घरात चिखल, गाळ यामुळे नागरिकांनी रात्र साफसफाई आणि सामान वाचविण्यामध्ये गेली. सकाळी पाणीच नसल्याने सर्वांचे अतोनाल हाल झाले.

  मुंबई : जोरदार पडणाऱ्या पावसामुळे उपनगरातील रहिवाशी हैराण आहेत. पोईसर नदी अरुंद झाल्यामुळे झोपडपट्टी सहीत सोसायाट्यामध्येही पाणी शिरल्याने रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

  मालाड, कांदिवली, गावठाण या भागात पाणी भरले. कांदिवली पूर्व लोखंडवाला, महिंद्रा कंपनी हनुमान नगर, आकुर्ली रोड, राम नगर,अण्णा नगर तर पश्चिमेला गणेश नगर, साई नगर,जय महाराष्ट्र नगरामध्ये घरात पाणी शिरले. नदीला लागूनच असणारे कांदिवली गावठाण, डहाणूकर वाडीतही २६ जुलै नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणी भरले. शनिवारी रात्रीच्या पावसाने जोर धरल्याने रहिवाशांना आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास उसंत मिळाली नाही.

  झोपडपट्टीतील रहिवाशी गाढ झोपेत असताना घरात पाणी शिरले.यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य सामान वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र तासभरात गुढघ्या इतके पाणी शिरल्याने पलंग, कपाट, टेलिव्हिजन इतर सामानाची नासधूस झाली. घरात चिखल, गाळ यामुळे नागरिकांनी रात्र साफसफाई आणि सामान वाचविण्यामध्ये गेली. सकाळी पाणीच नसल्याने सर्वांचे अतोनाल हाल झाले.

  पूर्वे कडील जोगळेकर नाला, हनुमान नगर नाला आणि पश्चिमेकडील पोयसर नदी मध्ये अतिक्रमण करून अरुंद केल्याने दरवर्षी जोरदार पावसात हजारो कुटुंबियांना आर्थिक,मानसिक त्रास सहन करावा लागतो. असे स्थानिक नागरिकांनी सांगत आपली व्यथा मांडली. वाहने पाण्यात अडकली, दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे लॉकडाऊन काळात मोठे नुकसान झाल्याचे गावठाणातील रहिवाशी आशिष पाटील यांनी सांगितले.

  कांदिवली पूर्व हनुमान नगर मधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यांना अल्पोहार,भोजन सामाजिक कार्यकर्ते भावेश जोशी यांनी दिले.

  The plight of the citizens as the poisar River narrows Huge loss of residents due to infiltration of water in slums and societies