…यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत ; भाजपची टीका

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खतांच्या किमती कमी करण्याबाबत केंद्राला पत्र लिहिले आहे. यावरून, शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. 

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशभरात विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अलीकडेच केंद्र सरकारने खतावरील अनुदान १४० टक्क्यांनी वाढवले. याचाच परिणाम म्हणून खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली. यावरून विरोधकांनी केंद्रावर टीका केली.

    तसेच माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खतांच्या किमती कमी करण्याबाबत केंद्राला पत्र लिहिले आहे. यावरून, शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

    खतांच्या दरवाढीमुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी खतांच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्रीय रसायने व खतमंत्री सदानंद गौडा यांना पत्र पाठविले होते. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली.