राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तविला अंदाज

गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं चांगलाच मुक्काम ठोकल्याचं पहायला मिळत आहे. सगळीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाल्यानं पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

    मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं चांगलाच मुक्काम ठोकल्याचं पहायला मिळत आहे. सगळीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाल्यानं पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 4-5 मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

    कोकण, मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक असणार असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पावसाचं भयावह रुप पहायला मिळत आहे. गणेशाच्या आगमनानंतर पावसानं अजून जोर धरलेला असून अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसचीही शक्यता ठरली आहे.

    दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्रात कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही तासांत मुसधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.