घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात होतेय वाढ, पण सबसिडी मिळतेय की नाही? ग्राहकांमध्ये संभ्रम; अशी चेक करा सबसिडी

पेट्रोलियम कंपन्या काही दिवसांपासून LPGच्या दरांमध्ये वाढ करीत आहेत. यामुळे असंख्य ग्राहक याबाबतीत विचार करीत आहेत की, त्यांना सबसिडी मिळेल की नाही. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर, सबसिडी तपासण्याची पद्धत माहित करून घ्या. दोन पद्धतीने तुम्हाला सबसिडी तपासता येईल.

  नवी मुंबई : मागील तीन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दरवाढीसोबतच घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय की नाही, याबाबतचा गोंधळ ग्राहकांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे.

  पेट्रोलियम कंपन्या काही दिवसांपासून LPGच्या दरांमध्ये वाढ करीत आहेत. यामुळे असंख्य ग्राहक याबाबतीत विचार करीत आहेत की, त्यांना सबसिडी मिळेल की नाही. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर, सबसिडी तपासण्याची पद्धत माहित करून घ्या. दोन पद्धतीने तुम्हाला सबसिडी तपासता येईल.

  अशी तपासा सबसिडीची रक्कम

  ‘माय एलपीजी’च्या संकेत स्थळाला भेट द्या.

  या ठिकाणी १७ अंकी LPG ID नमूद करा

  नोंदणीकृत संपर्क क्रमांक नमूद करा (registered mobile number)

  कॅप्चा कोड भरा.

  तुमच्या क्रमांकावर OTP येईल

  पुढील पानावर जाऊन आपला ईमेल आयडी नमूद करा

  ईमेल आयडीवर आलेली एक्टिवेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे अकाऊंट एक्टिवेट होईल.

  यानंतर mylpg.in वर जाऊन लॉगइन करा

  आधार क्रमांक एलपीजीला लिंक असेल याची खात्री करा

  त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred या पर्यायावर क्लिक करा.