बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची : शरद पवार

आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. असे शरद पवार (Sharad Pawar ) यांनी म्हटले आहे.

मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या (Delhi) सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Agitation) करीत आहेत. कृषी धोरणाला शेतकरी विरोध करत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासन कर्त्यांची आहे. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांनी केंद्र सरकार आणि उद्योगपती यांच्यावर साधला निशाणा

आजचा कृषीदिन हा शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करतोय तसेच मुंबईतही आंदोलन सुरू केलंय. केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार हा कायदा रेटू पाहतंय . त्यांना शेतकऱ्यांच्या हिताच काही पडलेलं नाही. आंदोलकांचे जीव जातायत, पण सरकार तरीही त्याकडे दुर्लक्ष करतंय यापेक्षा मोठं दुर्दैव काय ? असं म्हणतं संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि उद्योगपती यांच्यावर निशाणा साधला आहे.