The question of life and death before Idli-Vada vendors; Small business in Dharavi in ​​trouble

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने भारतभर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुंबईतील धारावी परिसरात अनेक गल्ल्याबोळ्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये विशेषतः धारावीमध्ये अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा रोजगार गेला होता. आता पुन्हा तीच परिस्थिती दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्भवलेली आहे.

    मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने भारतभर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुंबईतील धारावी परिसरात अनेक गल्ल्याबोळ्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये विशेषतः धारावीमध्ये अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा रोजगार गेला होता. आता पुन्हा तीच परिस्थिती दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्भवलेली आहे.

    मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाड्यांवर इडली-वडा विकणारे व्यवसायिकांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आली आहे. रोज हातावर पोट असणाऱ्यांना या व्यावसायिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. यासंदर्भात सरकार विचार करणार आहे का? असा सवाल आता हे व्यावसायिक उपस्थित करत आहेत.

    धारावी परिसरातील ९० फुट रस्त्यावरील लक्ष्मीचाळ ही सगळ्या मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. या चाळीमध्ये इडली-वडा यांसारखे नाश्त्याचे पदार्थ बनवून ते मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर विकणारे व्यावसायिक राहतात. त्यांची संख्या २०० ते ३०० इतकी आहे. त्या सगळ्या व्यावसायिकांवरती दुसऱ्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांसमोर जगावे की मरावे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.