मराठा आरक्षणाचा प्रश्ना गुंतागुंतीचा करु नये; नेत्यांनी संयम बाळगावा : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले की, मी मागील दोन-तीन दिवस हेच वाचत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे परंतु ओबीसी समजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. त्यामुळे मी मराठा समाजाच्या नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी आरक्षण प्रकरण वाद जास्त गुंतागुंतीचे करु नये.

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने (SC) स्थगिती दिल्याने मराठा समाज  (Maratha Community) आक्रमक झाला आहे. सोमवारी मराठा समाजाने सोलापूर बंदची हाक दिली होती. तर मुंबईत रविवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आवाहन केले आहे. त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना (Maratha Leader) म्हटले आहे की, वंचित समाजाच्या नेत्यांनी थोडा संयम बाळगायला हवा, त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये. जर गोंधळ अधिक झाला तर मराठा आरक्षण गमवायची वेळ येऊ शकते.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर राज्यातील ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसदर्भात कामासाठी साखर आयुक्तलयात आले होते. तेव्हा त्यांना मराठा समाजाला ओबीसी समाजाने मन मोठे करुन समाविष्ट करुन घ्यावे असा प्रश्न विचारला असता. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले की, मी मागील दोन-तीन दिवस हेच वाचत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे परंतु ओबीसी समजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. त्यामुळे मी मराठा समाजाच्या नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी आरक्षण प्रकरण वाद जास्त गुंतागुंतीचे करु नये. तसेच ओबीसीच्या आरक्षणात हिस्सा मागण्याच्या भानगडीतही पडू नये असे त्यांनी म्हटले आहे.