medical education

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर अनेक हल्ले होत असून या हल्ल्यात काही डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशी घटना घडल्यास वैद्यकीय सेवा कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येते आणि गुन्हेही दाखल कऱण्यात येतात. सध्या ही तरतूद पुरेशी असली तरीही त्यातील त्रुटी तपासण्यासाठी तज्ज्ञांची समितीची गठीत करण्यात येणार आहे.

    मुंबई : रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर तेथील डॉक्टरांना जबाबदार धरून त्यांना मारहाण करण्यात येते. त्यामुळे असे हल्ले रोखण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

    राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले वाढत आहेत, हे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी त्यामुळे न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि डॉक्टरांच्या संरक्षण करिता तरतूद करावी अशी विनंती करणारी याचिका डॉक्टर राजीव जोशी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर अनेक हल्ले होत असून या हल्ल्यात काही डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशी घटना घडल्यास वैद्यकीय सेवा कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येते आणि गुन्हेही दाखल कऱण्यात येतात. सध्या ही तरतूद पुरेशी असली तरीही त्यातील त्रुटी तपासण्यासाठी तज्ज्ञांची समितीची गठीत करण्यात येणार आहे. त्यामुळे डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल, अशी आशा यावेळी राज्य सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आली. त्याची दखल घेत खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी ३१ मार्चपर्यंत तहकूब केली.