मुंबईकरांची धाकधूक वाढवणारा प्रश्न-लोकल पुन्हा बंद होणार का? पालकमंत्र्यांचे रेल्वे आणि लॉकडाऊनबाबत सूचक वक्तव्य

लॉकडाऊनचा निर्णय जनतेवर सोपवत मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लोकल पुन्हा बंद होणार का? मुंबईत पून्हा लॉकडाऊन होणार का? या प्रश्नांनी मुंबईकरांची धाकधूक वाढवली आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

    मुंबई : मागील काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra ) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनचा निर्णय जनतेवर सोपवत मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लोकल पुन्हा बंद होणार का? मुंबईत पून्हा लॉकडाऊन होणार का? या प्रश्नांनी मुंबईकरांची धाकधूक वाढवली आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

    कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी ही चिंतेची बाब आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याबाबत विचार केला जात आहे. यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    काही दिवसांआधी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता. रुग्णसांख्या कमी झाली नाही तर काय करणार यासाठी बैठक बोलवली आहे. लोकल ट्रेन संख्या कमी करावी का, बस रूट बदलावा का, खाऊ गल्ली बंद करायची का, हॉटेलची वेळ, सार्वजनिक ठिकाणी काय कारवाई करता येईल, यावर या बैठकीत चर्चा होईल”, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

    लॉकडाऊन लावण्याची मजबूरी येऊ नये हा प्रयत्न आहे. तरी नागरीकांनी जबाबदारपणे वागावे, गर्दी टाळावी, कोरोना नियमावलीचे पालन करावे असे आवाहन अस्लम शेख यांनी केले आहे.