हार्बर मार्गावरील रेल्वेची सेवा पुर्ववत रेल्वे विभागे ट्विट करत दिली माहिती

हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेची विस्कळीत झाली सेवा पूर्ववत झाली आहे. सेंट्रल रेल्वे विभागाने ट्विटरद्वारे सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली आहे.

    मुंबई: विद्युत पुरवठयात निर्माण झालेल्या समस्येमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि वडाळा/कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत झाली आहे. सेंट्रल रेल्वे विभागाने ट्विटरद्वारे सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली आहे.

    सेंट्रल विभागाने एका तासापूर्वी विद्युत प्रवासाच्या समस्यमुळे शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि वडाळा/कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेचीसेवा थांबवत असल्याचे म्हटले होते. इतर उपनगरीय सेवाव्यवस्थित सुरू असल्याचेसांगण्यात आले होते.

    त्यानंतर काही मिनिटापूर्वी हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली असून सर्व मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.