चक्क…उंदरांनी २९ हजार लिटरची दारू केली फस्त, मद्याबरोबर गांजा आणि अफूचाही घेतला स्वाद, काय आहे प्रकार?

एका वर्षानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून डेटा गोळा केला जात होता. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ५३ हजार ४७३ लीटर देशी दारू, २९ हजार ९९५ इंग्लीश दारू, बीअरचे २ हजार २०८ कॅन, ८०५ लीटर कच्ची दारू जप्त केली होती.

    मुंबई : हरियाणातील फरीदाबाद शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस ठाण्याच्या गोडावूनमधून २९ हजार लीटर दारूच्या बाटल्या आणि कंटनेर गायब झाले आहेत. त्यामुळे हे काम उंदारांनी केलं असून मद्यासोबतच गांजा, अफू या मादक पदार्थांची पाकिटेही त्यांनी कुरतडली आहेत. असा अजब दावा पोलिसांनी केला आहे.

    एका वर्षानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून डेटा गोळा केला जात होता. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ५३ हजार ४७३ लीटर देशी दारू, २९ हजार ९९५ इंग्लीश दारू, बीअरचे २ हजार २०८ कॅन, ८०५ लीटर कच्ची दारू जप्त केली होती. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हे दारू जप्त करण्यात आली असून दारू गोडावूनमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, ही दारू व गांजा उंदारांनी प्राशन केली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

    उंदरांनी संपवली दारु

    उंदरांनी देशी आणि कच्ची दारु असे सुमारे २०,००० लीटर मद्य वाया गेले आहे. उंदरांच्या कुरतडल्यामुळे दारु वाहून गेली आहे. त्याचवेळी इंग्लीश दारुच्या बाटल्यांचे झाकण तोडून उंदीरांनी जप्त केलेली सुमारे ९ हजार लीटर दारू गायब केली, असे काही पोलिसांचे म्हणणे आहे.