नारायण राणेंची उंची त्यापेक्षाही मोठी…; संजय राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया

नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा, असे राऊत म्हणाले.

    मुंबई: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यात महाराष्ट्रातून चार खासदारांना मंत्रीपद देण्यात आले. यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राणेंच्या मंत्रीपदावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा, असे राऊत म्हणाले.

    माध्यमाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदे आली आहेत. पण, प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडला. नक्कीच नारायण राणेंना मंत्री सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खाते दिले, पण राणेंची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. आता फक्त राणेंपुढे रोजगार वाढवण्याचे मोठे काम आहे, असे राऊत म्हणाले.