फक्त अश्रू ढाळून अपयशाची जबाबदारी झटकता येणार नाही; राष्ट्रवादीचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कसे अपयशी ठरले, हे सांगणारी करोना मृत्यूंची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ५ एप्रिल २०२१ रोजी देशातील एकूण मृत्यू १ लाख ६५ हजार १०१ इतके होते. त्यानंतर पुढच्या २५ दिवसांत म्हणजे १ मे रोजी देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख ११ हजार इतकी झाली. आज देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ३ हजार ७२० वर पोहोचला आहे. याचाच अर्थ मागच्या २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कडून देण्यात आली आहे.

  मुंबई :  देशाला गरज असताना मोठ्या प्रमाणात लशी निर्यात करण्यात आल्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून देशात करोना मृत्यूंचा आकडा सातत्याने वाढत गेला. हा आकडा आता तीन लाखांच्यावर गेला आहे. याची जबाबदारी आपणास घ्यावीच लागेल, असे ट्विट करत राष्ट्रवादीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

  २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कसे अपयशी ठरले, हे सांगणारी करोना मृत्यूंची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ५ एप्रिल २०२१ रोजी देशातील एकूण मृत्यू १ लाख ६५ हजार १०१ इतके होते. त्यानंतर पुढच्या २५ दिवसांत म्हणजे १ मे रोजी देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख ११ हजार इतकी झाली. आज देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ३ हजार ७२० वर पोहोचला आहे. याचाच अर्थ मागच्या २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कडून देण्यात आली आहे.

  जबाबदारी आपणास घ्यावीच लागेल

  या ट्विट मध्ये म्हटले आहे की, करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असतानाच कुंभमेळा, पाच राज्यांत निवडणुका घेण्यात आल्या. टाळेबंदी सारखे निर्बंध हा शेवटचा पर्याय म्हणून पाहावा, असे त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना सांगत होते. दुसरीकडे देशाला गरज असताना मोठ्या प्रमाणात लशी निर्यात करण्यात आल्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून देशात करोना मृत्यूंचा आकडा सातत्याने वाढत गेला. हा आकडा आता तीन लाखांच्यावर गेला आहे. याची जबाबदारी आपणास घ्यावीच लागेल, असा निशाणा राष्ट्रवादीने साधला आहे.

  अपयशाची जबाबदारी झटकता येणार नाही

  राष्ट्रवादीने म्हटले आहे की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरही व्यवस्थेचा कल आपण करोना काळात कसे चांगले काम केले आहे, हे दाखवण्याकडे आहे. पण गंगा किनारी दफन केलेले हजारो मृतदेह व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देत आहेत. त्यामुळे केवळ अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्याने या अपयशाची जबाबदारी झटकता येणार नाही’, असे परखड मतही राष्ट्रवादीच्या व्टिटर हँडलवरून व्यक्त करण्यात आले आहे.