सेटवरील सर्व क्रू मेंबर्सची जबाबदारी पूर्णपणे निर्मात्यांवर, राज्यातल्या प्रोड्यूसर्संना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही निर्मात्यांना शुटींग स्थळ तसेच शुटींगच्या वेळेसंदर्भात पोलिसांसोबत समन्वय साधण्याचा आदेश दिला आहे. यादरम्यान निर्मात्यांनी शुटींगची ठराविक वेळ वाढवण्याबाबत मागणी केली होती.फिल्म प्रोड्यूसर्स गिल्डच्या सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही निर्मात्यांना शुटींग स्थळ तसेच शुटींगच्या वेळेसंदर्भात पोलिसांसोबत समन्वय साधण्याचा आदेश दिला आहे. यादरम्यान निर्मात्यांनी शुटींगची ठराविक वेळ वाढवण्याबाबत मागणी केली होती.फिल्म प्रोड्यूसर्स गिल्डच्या सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान नियमित कोरोना चाचणी करण्यात यावी, कोरोना महामारी संबंधित नियमांचं पालन करण्यात यावं, तसेच चित्रपट आणि सेटवरील इतर श्रमिक व्यक्तींचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावं. तसेच मुख्यमंत्र्यांनी असंदेखील सांगितलं आहे, की सेटवर उपस्थित सर्व क्रू मेंबर्सची जबाबदारी पूर्णपणे निर्मात्यांवर असेल. कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुसार, या बैठकीमध्ये नागराज मंजुळे, राकेश ओमप्रकाश मेहरा, रितेश सिधवानी, सुबोध भावे आणि रवी जाधवसोबत इतर लोकही उपस्थित होते.

    शुटींगला या वेळेत परवानगी

    मीडिया रिपोर्टनुसार कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र सरकारने सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत शुटींगला परवानगी दिलेली आहे. तसेच प्रत्येक शुटींगसाठी पोलिसांची आधीपासून परवानगी घेणं बंधनकारक आहे. तसेच सेटवर कोरोना संबंधी प्रत्येक प्रोटोकॉल व्यवस्थितरित्या सांभाळणंदेखील बंधनकारक आहे. अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.