आज दहावीचा निकाल जाहीर होणार; इथे पाहा रिझल्ट

या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 मुलींचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल http://result.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

    मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

    या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 मुलींचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल http://result.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

    मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्याक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मंडळाने परीक्षेचे निकाल तयार केले आहेत.