कुछ तो गडबड जरूर है दया…बोर्डाचा रिझल्ट हॉटेलमध्ये, मेन्यूकार्ड पाहून तुम्हीही द्याल फुल मार्क्स

आपण मेन्यूकार्ड मागवून खाण्याची ऑर्डर देतो. परंतु मेन्यूकार्ड (Menu Card) ऐवजी बोर्डाची निकाल (Board Result) हाती आला तर, एक क्षणाला आपल्याला धक्काच बसेल. परंतु हा मेन्यूकार्ड पाहून तुम्ही सुद्धा फुल मार्क्स(Full Marks) द्याल. या मेनूकार्डची सोशल मीडियावर (Social Media) तुफान चर्चा होत आहे.

मुंबई : हॉटेलमध्ये (Hotel) गेल्यावर आपल्याला विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपण विचार करतो की, नक्की काय खाऊ… त्यानंतर आपण मेन्यूकार्ड मागवून खाण्याची ऑर्डर देतो. परंतु मेन्यूकार्ड (Menu Card) ऐवजी बोर्डाची निकाल (Board Result) हाती आला तर, एक क्षणाला आपल्याला धक्काच बसेल. परंतु हा मेन्यूकार्ड पाहून तुम्ही सुद्धा फुल मार्क्स(Full Marks) द्याल. या मेनूकार्डची सोशल मीडियावर (Social Media) तुफान चर्चा होत आहे.

काय आहे या मेनूकार्डमध्ये ?

या मेनूकार्डमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या निकालासारखं चक्क हे मेनूकार्ड तयार करण्यात आलं आहे. हे मेनूकार्ड आहे की बोर्डाचा निकाल असा दोन मिनिटं आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचं फॉरमॅटमध्ये हे मेनूकार्ड बसवण्यात आलं आहे. हे मेनूकार्डमध्ये पाहिलं तर जिथे बोर्डाचं नाव लिहिलेलं असतं तिथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक खाद्य मंडळ पुणे असं लिहिण्यात आलं आहे. घरगुती व लज्जतदार जेवणाचं प्रमाणपत्र परीक्ष-दरपत्रक असं या पत्रकावर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे आपण मेनूकार्ड वाचतोय की बोर्डाचं प्रमाणपत्र असा प्रश्न पडेल.

बोर्डाच्या प्रमाणपत्रकाप्रमाणे शाखा क्रमांक, टेबल नंबर, केंद्र क्रमांक, जिल्हा आणि शाखा क्रमांक, परीक्षेचं वर्ष आणि सीट नंबर देखील देण्यात आला आहे. जिथे विषयाची नावं आणि गुण असतात तिथे पदार्थांची नावं आणि त्यांची किंमत अनुक्रमानं लिहिण्यात आलं आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे मेनू यामध्ये लिहिण्यात आले आहेत. अगदी बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रतिकृती म्हणजे हे मनूकार्ड तयार करण्यात आलं आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना किंवा सुविधा दिल्या जात असताना अशा प्रकारचं आगळं वेगळं मेनूकार्ड महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.