प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ इतकी असून कोरोनामुळे सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  मुंबई: राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल  (Result ) आज (१६ जुलै) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने https://result.mh-ssc.ac.in/ या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ इतकी असून कोरोनामुळे सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  दहावीच्या निकालानंतर ११ वी साथीची प्रवेश प्रक्रिया अशी असेल

  • ११ वीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेतली जाणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
   १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.
  • ११ वी प्रवेश परीक्षा राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
  • सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील आणि त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.