अफगाणिस्तान विषयावर सर्वपक्षीय एकजूट राहिली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका : नवाब मलिक

अफगाणिस्तान विषयावर सर्व पक्षीय एकजूट राहिली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    मुंबई : अफगाणिस्तान विषयावर सर्व पक्षीय एकजूट राहिली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    आज दिल्ली मध्ये अफगाणिस्तान विषयावर सर्व पक्षीय बैठक ११ वाजता होत असून आदरणीय खासदार शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले. आजपर्यंतच्या घडामोडीबाबतची माहिती या बैठकीत दिली जाईल आणि पुढे काय करायचे याची चर्चा होईल असेही नवाब मलिक यांनी सांगितले.