मुंबईत मुसळधार पावसामुळे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे छत कोसळले

मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील  डॉ. डी. वाय. पाटील  स्टेडियमला बसला असून या स्टेडियमच्या छताचा काही भाग कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत वाऱ्याचा वेग ७० किलोमीटर प्रती तास असून  येत्या २४ तासात कोकणसह मुंबई, मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग १०० किलोमीटर प्रति तास होणार असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.    

मुंबईत आज पावसाचा जोर दुपारनंतर वाढला आहे.जोराचा वारा आणि पाऊस यामुळं अनेक ठिकाणी झाड कोसळली आहेत तर अनेक ठिकाणी छप्परे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमलाही पावसाचा फटका बसला असून  छताचा काही भाग कोसळला आहे.  तसेच पत्रेही उडून गेले आहेत. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम आहे .अद्यापर्यंत स्टेडिअमचे किती नुकसान झाले आहे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.