शिक्षक अन् कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचेही वेतन रखडणार

मुंबई : राज्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च पासून वेतन रखडले आहे. पण कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मात्र सहकारी बँकांनी त्यांच्या मागे तगादा लावला आहे.त्यामुळे हे शिक्षक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

 मुंबई :  राज्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च पासून वेतन रखडले आहे. पण कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मात्र सहकारी बँकांनी त्यांच्या मागे तगादा लावला आहे.त्यामुळे हे शिक्षक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

कर्जाच्या हप्त्यांचे ईसीएस परस्पर कापणे बंद करा, अशी मागणी शिक्षक परिषदेने राज्य सरकारकडे केली होती.इसीएस कापणे बंद झाले. पण सहकारी बँका कर्जदार शिक्षक व कर्मचाऱ्यांना फोन करून हप्ता स्वतः बँकेत येऊन भरा, अन्यथा दंड भरावा लागणार आहे.असे सांगत आहे.बँकांनी कोणताही दिलासा दिलेला नाही.त्यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. 
एप्रिल महिन्याची वेतनबिले जमा करण्याचा कालावधी १० ते २० एप्रिल पर्यंतअसतो. मार्च महिन्याच्या वेतनाबाबत शासनाच्या बदलेल्या निर्णयामुळे अगोदरच विलंब झाला आहे. काल मार्च महिन्याचे वेतन बऱ्याच ठिकाणी जमा झाले, त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र एप्रिल महिन्याची वेतनबीले मार्च  महिन्याच्या वेतनबिलासोबतच जमा करुन घेण्याची विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शासनाकडे  १३ एप्रिल रोजी पत्र देऊन केली होती. पण त्याबाबत शासनाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
       एप्रिल महिन्याची वेतनबिले नेमकी कशी करावीत, याविषयीचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शासनाकडे केली होती. शासनाने एप्रिल महिन्याच्या वेतनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने एप्रिल महिन्याचेही वेतन मिळण्यास विलंब होणार असल्याची चर्चा आहे.