open school

ल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असल्याने मार्च 2020 पासून स्कूल बस उभ्या आहेत. यामुळे स्कूल बस चालक कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. परिणामी, शासनाने संकटकाळात मार्च 2020 पासून स्कूल बस चालकांचे थकलेले सर्व प्रकारचे कर, शुल्क आणि दंड माफ करण्याची मागणी स्कूल आणि कंपनी बस ओनर्स असोसिएशनने केली आहे.

    मुंबई :  गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असल्याने मार्च 2020 पासून स्कूल बस उभ्या आहेत. यामुळे स्कूल बस चालक कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. परिणामी, शासनाने संकटकाळात मार्च 2020 पासून स्कूल बस चालकांचे थकलेले सर्व प्रकारचे कर, शुल्क आणि दंड माफ करण्याची मागणी स्कूल आणि कंपनी बस ओनर्स असोसिएशनने केली आहे.

    राज्यातील स्कूल बस मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

    स्कूल बसवर कर व कर्जाचे हफ्ते थकल्याने अनेक स्कूल बसवर जप्तीची कारवाई होणार आहे. तसे झाल्यास उदरनिर्वाहाचे साधनही हाती राहणार नाही. परिणामी, मासिक 2 टक्के दराने आकारण्यात येणारे दंड माफ करून कर व कर्जमाफी देण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.