कॉंग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या चाचपणी सह कॉंग्रेस मंत्र्याच्या कामगिरीची झाडाझडती; काँग्रेस प्रभारी एचके पाटील तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर.

भारी एच के पाटील राज्यातील काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांची कामगिरी, किमान समान कार्यक्रमातील काँग्रेसच्या पूर्ण झालेल्या मागण्या याबाबतही या बैठकीत चर्चा अपेक्षीत आहे. त्याच बरोबर पाटील महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचा आढावा घेणार आहेत.

    मुंबई: महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एचके पाटील गुरुवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर,येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सात जुलै रोजी होणा-या विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेसचा विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याची चाचपणी करण्यासह महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस मंत्र्याच्या कामगिरीबाबत आढावा घेण्यासाठी काँग्रेस प्रभारी एचके पाटील तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

    कॉंग्रेस मंत्र्याची झाडाझडती होणार
    यावेळी प्रभारी एच के पाटील राज्यातील काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांची कामगिरी, किमान समान कार्यक्रमातील काँग्रेसच्या पूर्ण झालेल्या मागण्या याबाबतही या बैठकीत चर्चा अपेक्षीत आहे. त्याच बरोबर पाटील महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचा आढावा घेणार आहेत.

    विधानसभा अध्यक्षपदाचा पेच
    प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. त्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षातून विद्यमान मंत्र्याची नियुक्ती करण्यात यावी तसेच रिक्त पदावर नाना पटोले यांची वर्णी लावण्यात यावी यासाठी पटोले आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्यांनी नुकताच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतही प्रभारी पाटील पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यासोबत विचार विनीमय करतील अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे.