सक्तवसुली संचलनालयाच्या संपर्काबाहेर गेल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध सुरू

सक्त वसुली संचलनालयाने तीनदा समन्स काढूनही चौकशीला सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात जाण्याचे टाळणारे  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हवाला प्रतिबंधक कायदा (पीएम  एलए) अंतर्गत ४ कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीला रवाना झाल्यानंतर देशमुख नॉट रिचेबल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  मुंबई :  सक्त वसुली संचलनालयाने तीनदा समन्स काढूनही चौकशीला सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात जाण्याचे टाळणारे  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हवाला प्रतिबंधक कायदा (पीएम  एलए) अंतर्गत ४ कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीला रवाना झाल्यानंतर देशमुख नॉट रिचेबल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  वाझे याने चार कोटी रूपये दिल्याचा जबाब

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या विरोधात आधी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते त्या नंतर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सीबीआय तपासा शंभर कोटी रूपये खंडणी वसुली केल्याबाबतऍंटालिया प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या बडतर्फ पोलीस निरिक्षक सचिन वाझे याने चार कोटी रूपये जमा करून देशमुख यांच्या स्विय सचिव आणि सहायकांना दिल्याचा जबाब दिला होता. त्यानंतर या प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाने तपास सुरू केला होता.

  मालमत्ता जप्तीनंतर तिसरे समन्स

  त्यात देशमुख यांच्या मुंबईसह नागपूरातील निवासस्थानावर छापे घालण्यात आले होते. तसेच देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव पालांडे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशमुख यांच्यावर जप्तीची कारवाई करत देशमुख यांची ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मालमत्ता जप्तीनंतर ‘ईडी’ने देशमुख यांना तिसरे समन्स बजावले मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

  पत्नी व मुलगा यांनाही समन्स

  तसेच, त्यांचा संपर्कही होत नसल्याने ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी रविवारी देशमुख यांच्या काटोल येथील वडिलोपार्जित निवासस्थानी व नागपूर परिसरातील काही ठिकाणांवर छापे टाकले. त्याच प्रमाणे त्यांच्या पत्नी आरती व मुलगा ऋषीकेश यांनाही समन्स बजावल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.