The search for the accused; Jewelers in Dahisar were shot all day

दहिसर पोलिसांनी दरोडा व खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. गोळी झाडून दुकानदाराची हत्या करणारे तिघे जण दागिने लुटून पळून गेले होते. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून तिघांनी अटक केली. ज्यांनी या सर्व गुन्ह्यांचा कट रचला त्या दोन सुत्रधारांना अटक करण्यात यश आले. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ते गुजरातच्या एका खेडेगावात लपले होते.

    मुंबई : बोरिवलीपासून जवळच असलेल्या दहिसर भागात बुधवारी धक्कादायक घटना घडली. दहिसरमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार करण्यात आला. दहिसर पूर्वेला रावल पाडा परिसरात गावडेनगरमध्ये ओम साई राज ज्वेलर्सचे दुकानात सकाळी पावणे अकराच्या सुमारास तीन जणांनी दुकानात घुसून दुकानदाराला गोळ्या घालून ठार केले आणि सोन्याचा माल लुटला. या खुन्यांना अवघ्या दोन दिवसांच्या आत पोलिसांनी जेरबंद केले. एका बुटावरून पोलिसांनी खुनी आरोपींचा शोध लावल्याची माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

    दहिसर पोलिसांनी दरोडा व खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. गोळी झाडून दुकानदाराची हत्या करणारे तिघे जण दागिने लुटून पळून गेले होते. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून तिघांनी अटक केली. ज्यांनी या सर्व गुन्ह्यांचा कट रचला त्या दोन सुत्रधारांना अटक करण्यात यश आले. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ते गुजरातच्या एका खेडेगावात लपले होते.

    प्राथमिक तपासात एका दुचाकीचा वापर करण्यात आला होता. ती गाडी चोरीची होती. काही अंतरावर हे आरोपी एका कारने आले होते. आरोपीच्या एका बुटावरून गुन्हा उघडकीस आला. दुचाकी चोरताना जे बूट पायात दिसले तेच बूट दहिसरच्या गुन्ह्यातही आरोपीच्या पायात होते, अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.